Share

अनिल देशमुखांची चौकशीला पुन्हा एकदा दांडी; ईडी कठोर पाऊल उचलणार ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने पाचव्यांदा समन्स बजावूनही ते आज गैरहजर राहिले आहेत.अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग ईडीच्या कार्यालयात आले होते. दरम्यान ईडीकडून अनिल देशमुख यांना बजावलेलं हे पाचवं समन्स होतं.

पाच वेळा समन्स बजावून देखील देशमुख यांनी कोर्टातील याचिकेचा हवाला देत चौकशीला उपस्थित राहणे टाळले. त्यामुळे ईडी आता त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे. त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी ईडीला एक निवेदन दिलं. यामध्ये त्यांनी पुन्हा समन्स बजावला जाऊ नये, अशी विनंती करतानाच सवलत देण्याची देखील मागणी केली आहे. त्यामुळे ईडी आता देशमुखांच्या निवदेनानंतर काय पाऊल उचलणार हे महत्वाचं ठरणार आहे.

अनिल देशमुख यांनी निवेदनात नेमकं काय म्हटलंय ?

सुप्रीम कोर्टात आमची याचिका दाखल झाली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल आहेत. त्याच्याशी आमची याचिका जोडली गेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. पण जोपर्यंत आमचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, तोपर्यंत आम्हाला समन्स पाठवलं जाऊ नये. आम्हाला सवलत द्यावी. आमच्यासाठी अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्टातही जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला समन्स पाठवलं जाऊ नये, असं अनिल देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!