Share

स्टीव्ह स्मिथ आणि ऍरोन फिंच टी-२० विश्वचषकात पुनरागमन करणार?

Published On: 

मुंबई : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १७ ऑक्टोबर पासुन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवीण्यात येईल.

यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे महत्वाचे खेळाडू ऍरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ हे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान स्टीव्ह स्मिथची कोपराची दुखापत बवाळल्याने तो मैदानाबाहेर गेला होता. मात्र आता त्याने सरावाला सुरुवात केली असुन तो आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.

तर कर्णधार ऍरोन फिंच वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना जखमी झाला होता. या दौऱ्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र आता त्याची दुखापत बरी होत आहे. तोही आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज असल्याची चर्चा सुरु आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश संघाविरुद्ध टी-२० मालिका गमावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!