मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी तेथून पळ काढत आहेत. सोमवारी विमानतळावर झालेल्या गर्दीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचबरोबर विमानाच्या चाकाला लटकलेल्या लोकांपैकी काही जण खाली पडून मृत्यूमुखी पडले. एकूणच अशा भयावह स्थितीमध्ये अफगाणिस्तानात विविध देशांमधील अडकलेले अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामांसाठी गेलेले नागरिक हे सुरक्षित स्थळी परतण्यासाठी धडपड करत आहेत.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील महिलांसह जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. महिलांवर विविध निर्बंध घालण्यास येत आहेत. शरियतच्या कायद्यानुसार अफगाणिस्तान चालवण्यात येणार असल्याचे तालिबानने जाहीर केले आहे. दरम्यान, आता भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तालिबानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील साधर्म्य असल्याचे म्हटलं आहे.
त्यांनी शरद पवार यांच्या २०१८ मधील विधानाचा तपशील दिला आहे. ‘ट्रिपल तलाकचा मुद्दा काढला जातोय. मुस्लिम भगिनींना खरंच न्याय द्यायचा असेल तर मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते, धर्मगुरु यांना विश्वासात घेऊन पावले टाकावीत. तलाक हा कुराणने दिलेला संदेश आहे. त्या संदेशात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्यांना नाही. तुम्ही कुणाच्या धर्मात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही,’ असं शरद पवार यांनी औरंगाबाद येथील हल्लाबोल सभेत भाष्य केलं होतं.
"तलाक हा कुराणने दिलेला संदेश आहे. त्या संदेशात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्यांना नाही" असे महाराष्ट्रात तिहेरी तलाकच्या वेळी @PawarSpeaks २०१८ मध्ये म्हणाले होते. अफगाणिस्तान मधील नवे राज्यकर्ते हेच शरियाबद्दल सांगत आहेत. pic.twitter.com/o1OI3t4YAb
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 18, 2021
यावरून केशव उपाध्ये यांनी ट्विट करत , ‘तलाक हा कुराणने दिलेला संदेश आहे. त्या संदेशात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्यांना नाही, असे महाराष्ट्रात तिहेरी तलाकच्या वेळी शरद पवार २०१८ मध्ये म्हणाले होते. अफगाणिस्तान मधील नवे राज्यकर्ते हेच शरियाबद्दल सांगत आहेत,’ असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही कितीही ताकद लावा शेतकरी येणार अन् बैलगाडा शर्यत होणारच’
- भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाकडून तालिबानचे कौतुक
- ‘मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा दिल्लीतून लस आणण्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत’
- शाळा बंदवरून रघुराम राजन यांचा सरकारला गंभीर इशारा, म्हणाले..
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

