Share

“मास्कमुक्तीबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा,पण…”; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

Published On: 

कोल्हापूर: २०२० मार्च मध्ये पुणे शहरात महाराष्ट्र राज्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला आणि हळू हळू कोरोनाने महाराष्ट्रभर  आपले हात पाय पसरायला सुरुवात केली. २०२० मध्ये आलेल्या पहिल्या लाटेनंतर २०२१ च्या मार्च महिन्यात कोरोनाची देशभरात दुसरी लाट आली. तर २०२१ च्या अखेरीस कोरोनाच्या  तिसऱ्या लाटेने देशभरात हात पाय पसरायला सुरुवात केली. कोरोना विषाणूच्या पहिल्या दोन लाटांपेक्षा कोरोनाची तिसरी लाट ही अतिशय सौम्य आहे. त्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण देशभरात तसेच राज्यात वाढल्याने कोरोना विषाणूची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणत कमी झाली आहे. हा सर्व आढावा घेऊनच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज एक खुलासा केला आहे.

‘राज्यात करोनाची तिसरी लाट फारशी गंभीर नाही, त्यामुळे निर्बंध टप्प्याटप्याने कमी करण्यात येतील, मात्र मास्कमुक्ती सध्या तरी होणार नाही,’ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. फ्रान्स, जर्मनसह काही देशात मास्कमुक्ती निर्णयामागील नेमके तंत्र काय होतं, याची माहिती संकलित करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश  टोपे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. तेव्हा पत्रकारांशी संवाद ते म्हणाले, करोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. यामुळे मास्कमुक्तीबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली. पण, मास्कमुक्तीचा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही. काही देश कोणत्या पद्धतीने मास्क फ्री झाले याची माहिती घेण्यात येत आहे. टास्क फोर्स आणि केंद्राकडे ते पाठवून पुढील निर्णय घेतला जाईल. पण तोपर्यंत निर्बंध मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येतील.

     महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!