🕒 1 min read
नवी दिल्ली: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना देश-विदेशातील अनेक चाहत्यांनी आदरांजली अर्पण केली. त्यात आता सोशल मिडिया स्टार टांझानियाचे किली पॉल (Kili Paul) आणि त्याची बहीण नीमा पॉल (Neema Paul) यांनीही आदरांजली वाहिली आहे.
https://www.instagram.com/reel/CZwjkQvsV8x/?utm_source=ig_embed&ig_rid=5bf13328-a6d1-46fb-b0f2-4e12814dc17d
किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी लता मंगेशकर यांच्या ‘जाने क्या बात है’ या गाण्यावर लिप सिंक केले आहे. हा व्हिडिओ सध्या जाम व्हायरल झाला असून त्याला ७ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
त्यांनी लता मंगेशकर यांचा आवाज खूप शांत आणि अद्भुत असून त्या कायमच आमच्या आपल्या हृदयात राहतील असे या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळत असून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘पाचही राज्यात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट’; विजय वडेट्टीवार यांची टीका
- हॉकी प्रो लीग: भारतीय संघाने उडवला १०-२ ने आफ्रिकेचा धुव्वा
- गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस भाजप आमने-सामने; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
- IPL 2022: माहीची झलकच वेगळी! मेगा ऑक्शनआधी केलेली ऍक्शन पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात…!
- जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
