शाहजहांपुर: सायबर गुन्हेगारांसाठी कोणी लहान-मोठा नाही, कोणी गरीब-श्रीमंत नाही, त्यांच्या जाळ्यात जो येईल त्याला ते लुटूनच सोडतात. एका अश्याच प्रकरणात भाजपचे पूर्व खासदार शिकार बनले आहेत. गेल्या ७ फेब्रुवारीच्या रात्री त्यांच्या मोबाइल वर एक फोन आला. त्यात सायबर गुन्हेगारणांनी त्यांना एका महिलेची अश्लील चित्रे दाखवली. आणि नंतर एच एच ओ सायबर सेलच्या नावाने त्यांना एक फोन आला. त्यांना त्यात ब्लॅकमेल करत २५००० रुपयांची मागणी केली.
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुर येथील भाजपचे पूर्व खासदार मिथलेश कुमार यांच्यासोबत हा गुन्हा घडला. कुमार यांना बदायूच्या दातागंज विधानसभा मतदार संघाचे प्रचार प्रमुख म्हणून काम सोपविले आहे. त्याच दरम्यान ते ७ फेब्रुवारीच्या रात्री कंट्री इन हॉटेल मध्ये उतरले होते. यावेळी हा प्रकार घडला.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी त्यांच्याकडे पुन्हा पैशयची मागणी केली गेली. आणि जर पैसे नाही दिले तर तुमचे व्हिडिओ आम्ही प्रसार मध्यमांवर पसरावू अशी धमकी दिली होती. या नंतर त्यांनी सिविल लाइन पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलीस गुन्हेगारांच्या मागावर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- ‘विरोधकांनी गोव्याला लुटण्यासाठी…’; पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
- ‘माणसं नाहीतच, हे तर हैवान’; चित्रा वाघ यांची तीव्र प्रतिक्रिया
- हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- सावधान! कोरोना नंतर आला नवीन आजार, केरळमध्ये सापडला पहिला रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

