🕒 1 min read
मुंबई : साऊथचा लोकप्रिय सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ (film ‘Pushpa’) या चित्रपटाची चर्चा सतत सुरू आहे. चित्रपटातील गाण्यांसह त्यातील स्टाईलने अनेकांना भुरळ घातली आहे. दरम्यान, आता श्रीवल्ली गाण्यावर राणू मंडलचा (Ranu Mondal)डान्स व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये राणू मंडल पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर थिरकतांना दिसत आहे. तसेच त्यांच्या हातात काठी असल्याचे दिसत आहे. राणू मंडलच्या या व्हिडीओला अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून काही नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, ‘पुष्पा : ज राइज’ हा चित्रपट आता ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या पुष्पा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जूनच्या हटके स्टाईलने आजवर अनेकांना भुरळ घातले असून बऱ्याच सेलिब्रिटींनी यावर व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. आज ही पुष्पा चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कर्नाटकातील हिजाबचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईतील ‘या’ कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी
- मनसेची भूमिका हिंदुत्वाची, हिजाब वादावर मनसेची प्रतिक्रिया
- IND vs WI: काय सांगता…! सामन्यात केल्या फक्त १८ धावा तरी कोहलीने केला नवा विक्रम
- हिजाब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायलायचा नकार
- ‘किंग’ बनायचयं, ‘किंग मेकर’ नाही; शिवतीर्थ’वरील बैठकीनंतर मनसेची भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
