Share

भविष्यात भाजप-सेना एकत्र येणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…

Published On: 

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-सेना एकत्र येणार का, अशा चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप-सेनाने पुन्हा गाठ बांधावी अशी इच्छा बोलून दाखवली होती. आता या सर्व चर्चांवर आणि प्रश्नांवर स्वतः शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काल (२५ फेब्रुवारी) एका कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. तसेच भविष्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ज्या पद्धतीने आज भाजप चाललं आहे त्या पद्धतीने गेल्यास युती होणार नाही. भाजपने वैचारिक पातळी गमावली आहे. त्यामुळे कुणीच कुणाला बांधिल नसतं.”

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तरातून भाजप-सेना युती आता तरी शक्य नाही, असे दिसून येते. त्यात राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होणारी ईडी कारवाई, तसेच अटकसत्र यावरून भाजपने ठाकरे सरकारला चारी बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठाकरे कुटुंबियांची सुपारी घेतल्याचे म्हटले होते. तर रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे दोन्ही काँग्रेसच्या मध्ये फसले असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजपची अशी वक्तव्ये आणि इतर नेत्यांनी व्यक्त केलेल्या इच्छा यावरून भाजप-सेना एकत्र येणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता उद्धव ठाकरेंनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून तूर्तास तरी या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!