Share

“लोकांनी तुम्हाला बुडवण्याचा निश्चय केला असेल तर..”, भातखळ करांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

Published On: 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल (२५ फेब्रुवारी)एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपला निशाण्यावर धरले. यावेळी त्यांनी तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का? असा सवाल करत टोला लगावला. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधला आहे.

“मुख्यमंत्री महोदय, लोकांनी तुम्हाला बुडवण्याचा निश्चय केला असेल तर त्यांना रोखणार तरी कोण? पण सत्ता गेल्यावर टक्केवारीचा माल बंद झाला तरी खंडणीतून येणारा पैसा सुरूच राहील की?”, असा सवाल करणारे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान “सत्ता मिळवा पण ती लोकशाही मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचे राजकारण नासवले जात आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!