Share

“…मग आम्ही धुणीभांडी करायची का?”, मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांना टोला

Published On: 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपला निशाण्यावर धरले. यावेळी त्यांनी तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का? असा सवाल करत टोला लगावला आहे.

“सत्ता मिळवा पण ती लोकशाही मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचे राजकारण नासवले जात आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला मी पुन्हा येईन असं म्हणून न येणं हे वाईट असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच भविष्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का यावर ते म्हणाले की, “ज्या पद्धतीने आज भाजप चाललं आहे त्या पद्धतीने गेल्यास युती होणार नाही. भाजपने वैचारिक पातळी गमावली आहे. त्यामुळे कुणीच कुणाला बांधिल नसतं.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!