🕒 1 min read
मुंबई : एका कार्यक्रमात बोलत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. आगामी काही दिवसांनी राज्याचे अधिवेशन आहे. याच पार्श्वभूमीवर मी येत्या अधिवेशनात हजर राहणार, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रावर आपण जे उपकार करणार आहात त्या ऋणातून उतराई होण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगावा, असा खोचक टोलाही भातखळकरांनी लगावला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मी आगामी अधिवेशनात हजर राहणार; त्यांनतर मंत्रालयातही जाणार- उद्धव ठाकरे. महाराष्ट्रावर आपण जे उपकार करणार आहात त्या ऋणातून उतराई होण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगावा मुख्यमंत्री महोदय. महाराष्ट्र आपला आभारी आहे’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
मी आगामी अधिवेशनात हजर राहणार; त्यांनतर मंत्रालयातही जाणार- उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रावर आपण जे उपकार करणार आहात त्या ऋणातून उतराई होण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगावा मुख्यमंत्री महोदय.
महाराष्ट्र आपला आभारी आहे.???????? pic.twitter.com/ZX9sEWuKcq— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 26, 2022
दरम्यान, मधला कोरोनाचा काळ आव्हानात्मक होता. काही काळ मंत्रालयही बंद ठेवावं लागलं होतं. पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होतंय. ते झाल्यावर पुन्हा मंत्रालयात काम सुरू करणार, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
-
“…मग आम्ही धुणीभांडी करायची का?”, मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांना टोला
-
“हे मुख्यमंत्री की टोळीप्रमुख?”, मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
-
“…वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”, रशियाने दिली अमेरिकेला धमकी
-
भारतीय संघातील दुखापतीची मालिका संपेना ; ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर
-
यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडीचे हादरे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले दिसताय- अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
