🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. फक्त इतकेच नाही तर मलिक यांच्या सुटकेसाठी निदर्शनेही काढण्यात येत आहेत. याच मुद्द्यावरून भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यावरून मंत्र्याला अटक झाली म्हणून तातडीने आंदोलन करणारे महाआघाडीतील पक्ष…शेतकऱ्यांची वीज तोडली जात होती, मराठासमाजाचे आरक्षण रद्द झाले, OBC राजकीय आरक्षण रद्द झाले, ST कर्मचारी आत्महत्या करत होते तेव्हा आंदोलन सोडा एकदम चिडीचूप गप्प बसले होते’, असे उपाध्ये म्हणाले.
दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यावरून मंत्र्याला अटक झाली म्हणून तातडीने आंदोलन करणारे महाआघाडीतील पक्ष..
◾️शेतकऱ्यांची वीज तोडली जात होती
◾️मराठासमाजाचे आरक्षण रद्द झाले
◾️OBC राजकीय आरक्षण रद्द झाले
◾️ST कर्मचारी आत्महत्या करत होते
तेव्हा आंदोलन सोडा एकदम चिडीचूप गप्प बसले होते— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 25, 2022
दरम्यान, नवाब मलिक यांची काल(२५ फेब्रु.)जेजे रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“…मग आम्ही धुणीभांडी करायची का?”, मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांना टोला
-
“त्याने अजूनही माफी मागितली नाही”; रिद्धीमान साहाचा धमकी देणाऱ्या पत्रकारावर नवा खुलासा
-
“लोकांनी तुम्हाला बुडवण्याचा निश्चय केला असेल तर..”, भातखळ करांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
-
यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडीचे हादरे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले दिसताय- अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
