Share

भाजपच्या आमदारांचे ‘क्राइम फ्री सिटी’चे स्वप्न पूर्ण होणार का ? असा असेल नागपूरच्या विकासाचा आराखडा 

Published On: 

नागपूर : पूर्व नागपूरच्या मागासलेल्या भागातील पारडी, पुनापूर, भरतवाडा, भांडेवाडीच्या १७३0 एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण कार्य प्रारंभ केले आहे. ऑक्टोबरपासून स्मार्ट सिटी क्षेत्रामध्ये कार्यास गती येणार आहे. पॅन सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर सेफ अँण्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण शहरात ३६00 कॅमेरे लावण्यात आले आहे. शहरात सायकल चालविण्यायोग्य १८ कि.मी. रस्त्यावर ‘डेडीकेटेड बायसिकल लेन’ तयार करण्यात येणार आहे. सीताबर्डी बाजारपेठेला ‘व्हेइकल फ्री झोन’ करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती ‘स्मार्ट सिटी’च्या बैठकीत देण्यात आली.

नागपूर स्मार्ट अँण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सिटी लेव्हल अँडव्हायझरी फोरमच्या सभेचे सोमवारी (२८ सप्टेंबर) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील स्मार्ट सिटी कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते. महापौर व स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाचे सदस्य संदीप जोशी यांच्या पुढाकाराने सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेत खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, माजी आमदार प्रकाश गजभिये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत डायगव्हाणे व सिटी अँक्शन ग्रुपचे प्रमुख विवेक रानडे प्रामुख्याने उपस्थित होते. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सदस्यांसमोर स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.

स्मार्ट सिटीज मिशन केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने २0१५ मध्ये सुरू केले आहे. स्मार्ट सिटीचा उद्देश नागपूरला राहण्यायोग्य (लाईव्हली), प्रदूषणरहित, सुरक्षित, सस्टेनेबल व सुदृढ शहर बनविण्याचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमदार कृष्णा खोपडे यांनी स्मार्ट सिटीच्या पूर्व नागपुरातील क्षेत्रात कामात गती आणण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी प्रकल्प बाधित नागरिकांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी केली जेणेकरून त्यांच्या मनात प्रकल्पाबद्दल विश्‍वास निर्माण होईल आणि त्यांचे सहकार्य लाभेल.

या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार व प्रवक्ते गिरीश व्यास यांनी नागपूरला ‘क्राइम फ्री सिटी’ बनविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे कुख्यात बिनेकर हत्याकांड होऊन चोवीस तासही झालेले नव्हते, त्यामुळे स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत असलेले नागपूर शहर क्राईम फ्री होणार का अन भाजपच्या आमदार महोदयांनी इच्छा पूर्ण होणार का हेच बघावे लागेल. प्रकाश गजभिये यांनी स्मार्ट सिटीला फक्त एक क्षेत्रामध्ये नव्हे तर संपूर्ण शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. आभार प्रदर्शन कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकुर यांनी केले. सभेत स्मार्ट सिटीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!