अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शेवगाव शहरासह तालुक्यातील विविध राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ह्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे व जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत यांच्या नेतृत्वाखाली गाडगेबाबा चौकात शेवगाव-नगर महामार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करण्यात आले.
येत्या आठ दिवसांत हे सर्व खड्डे न बुजविल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यातून शेवगाव-पैठण, शेवगाव-गेवराई, शेवगाव-मिरीमार्ग नगर, शेवगाव-पाथर्डी या प्रमुख राज्यमार्गांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज याठिकाणी अनेक अपघात घडत असतात.
यावर स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. हे खड्डे तातडीने बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करत शेवगाव-नगर राज्यमार्गावर गाडगेबाबा चौकात मनसेच्यावतीने खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मनसे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, तालुका उपाध्यक्ष संजय वनवे, सुनील काथवटे, संदीप देशमुख, देवा हुशार, विठ्ठल दुधाळ, ज्ञानेश्वर कुसळकर, रविंद्र भोकरे, प्रसाद लिंगे, सुरेश सूर्यवंशी, मंगेश लोंढे, विलास सुरवसे, अमोल पालवे, मंदार मुळे, शशिकांत हुशार यांच्यासह तालुक्यातील अनेक मनसे सैनिक यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शेवगाव शहरासह तालुक्यातील विविध राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ह्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे व जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत यांच्या नेतृत्वाखाली गाडगेबाबा चौकात शेवगाव-नगर महामार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करण्यात आले.
येत्या आठ दिवसांत हे सर्व खड्डे न बुजविल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यातून शेवगाव-पैठण, शेवगाव-गेवराई, शेवगाव-मिरीमार्ग नगर, शेवगाव-पाथर्डी या प्रमुख राज्यमार्गांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज याठिकाणी अनेक अपघात घडत असतात. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. हे खड्डे तातडीने बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करत शेवगाव-नगर राज्यमार्गावर गाडगेबाबा चौकात मनसेच्यावतीने खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मनसे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, तालुका उपाध्यक्ष संजय वनवे, सुनील काथवटे, संदीप देशमुख, देवा हुशार, विठ्ठल दुधाळ, ज्ञानेश्वर कुसळकर, रविंद्र भोकरे, प्रसाद लिंगे, सुरेश सूर्यवंशी, मंगेश लोंढे, विलास सुरवसे, अमोल पालवे, मंदार मुळे, शशिकांत हुशार यांच्यासह तालुक्यातील अनेक मनसे सैनिक यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- विदर्भात ‘का’ पेटली नागपूर कराराची होळी, शंभरवर्षांच्या संघर्षासाठी हजारो वैदर्भीय रस्त्यावर
- ‘या’ शहरात काँग्रेस भोला भवनातून निघाला बैलबंडीतून मोर्चा, आंदोनाचे नेमके कारण…
- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’साठी अंगणवाडी सेविकांचा नकार, आता जबाबदारी गुरुजींच्या खांद्यावर
- शेतकऱ्यांच्या हितासाठी वाशीममध्ये मनसेने केले घंटानाद
- चौकशी सुरु असलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार ?, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now