Share

सीमा भागातला तरुण पिढ्यान पिढ्या यातना सहन करतोय; शरद पवारांनी जागवल्या आठवणी

Published On: 

मुंबई : ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचं आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी नेते हजर होते.

गेली अनेक दशके महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेला नाही. कर्नाटकच्या सीमाभागात अनेक मराठी भाषिकांना गळचेपी सहन करावी लागत आहे. त्यांच्यावर अनेक प्रकारे अन्याय केला जातो. या मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सहभागी व्हायचं आहे. मात्र, त्यांचा हा अनेक दशकांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. यावरच हे पुस्तक आधारित आहे.

या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी देखील सीमाप्रश्नावर भाष्य केलं. ‘संयमाचे श्रेय सीमावासीयांना जाते. सीमा भागातला तरुण पिढ्यान पिढ्या यातना सहन करतोय. महाराष्ट्रात राहायचे आहे यासाठी हवी ती किंमत द्यायला तयार आहेत’ अशा शब्दात पवारांनी सीमावासीयांचं कौतुक केलं आहे.

‘आमच्या यातना या कदाचित काही दिवसांच्या असतील, पण सीमाभागातील तरुण गेल्या अनेक वर्षांपासून या यातना भोगत आहे. आम्हाला मराठी भागात जायचे, महाराष्ट्रात राहायचे आहे, या एका भूमिकेसाठी त्यांनी चळवळ धगधगत ठेवली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सीमावादाच्या प्रश्नावरून मराठी माणूस अस्वस्थ आहे. या प्रश्नाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पुस्तक स्वरूपात समाजासमोर यावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले. डॉ. दीपक पवार यांनी ग्रंथाच्या रूपातून ही चळवळ आपल्या समोर मांडली आहे.’ असं ते म्हणाले.

तर, ‘आजही सीमाभागातील नागरिक नोव्हेंबरमधील एक दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रातूनही अनेक भागातील लोक या आंदोलनाला पाठिंबा देत होते. राज्यात महाराष्ट्र एकीकरण समिती गठीत करण्यात आली. माझ्यासह एस. एम. जोशी, स्व. बाळासाहेब ठाकरे, प्रा. एन. डी. पाटील, छगन भुजबळ असे नेते या समितीत होते. समितीच्या वतीने मीदेखील सीमाभागात जाऊन आंदोलन केले होते.’ देखील या निमित्ताने शरद पवार यांनी सांगितली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!