नवी दिल्ली: प्रवासात जास्तीच समान नेण्याची चिंता असते कारण हे सामान गाडी मध्ये ठेवणे आणि पुन्हा घरी घेऊन जाणे मोठे जोखमीचे ठरते यासाठी अनेकांकडून कुलींची मदत घेतात मात्र ते देखील कधी भेटत नसल्याने प्रवाश्यांना जास्तीच समान घेऊन रेल्वे प्रवास करणे त्रासदायक ठरत होते. मात्र आता ही समस्या दूर होणार आहे. कारण रेल्वेने एक खास योजना आणली आहे.
जास्तीच समान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच सामान घरापासून रेल्वे पर्यंत आणि रेल्वे पासून घरापर्यंत ने आण करण्याची जबाबदारी आता रल्वेने घेतली आहे. यासाठी रेल्वेने ‘बुकबॅगेज’ नावाचं एक नवीन अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून भारतीय रेल्वे तुमच्या सामानाचं हव्या त्या ठिकाणी वितरण करू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातून संबंधित पार्सल रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याचा आणि इतर ताण वाचणार आहे.
या व्यतिरिक्त ट्रेन डेस्टिनेशन स्टेशनवर आल्यानंतर, तुमचं सामान बर्थमधून उतरवलंही जाणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना प्रति बॅग 125 रुपये द्यावे लागणार आहेत. बॅग वाहतुकीपासून ते हेलकऱ्यापर्यंत (कुली) सर्व खर्च रेल्वे करणार आहे. यासाठी आपल्याला कोणतंही आगाऊ शुल्क देण्याची आवश्यकता नाही. रेल्वे विभागाने या सेवेला एका खास अॅपशी जोडलं आहे. ही सुविधा विशेषतः वयोवृद्ध प्रवाश्यांसाठी सोयीची असणार आहे.
यामध्ये सर्वप्रथम तुमचं सामान अल्ट्राव्हायलेट किरणांनी 360 डिग्री पर्यंत स्वच्छ केल जाणार आहे. त्यानंतर हे सामान सुरक्षितपणे पॅक केलं जाईल. जेणेकरून तुमच्या वस्तूंना कोणतीही हानी पोहचणार नाही. याशिवाय या अॅपच्या मदतीनं तुम्ही तुमच्या सामानाचं जीपीएस ट्रॅकिंगही करू शकता.
तुम्ही तुमच्या मोबाइलवर बुकबॅगेजचं अॅप डाउनलोड करुन या सेवेचा लाभ घेऊ शकता. या अॅपद्वारे तुम्ही सामानाचं बुकिंग करू शकता. तुम्ही होम डिलीव्हरी प्रकारची बुकिंग केली तर रेल्वे सुटण्याच्या तीन तास अगोदर तुमच्या घरातून तुमचं सामान पिकअप केलं जाईल.
त्याचबरोबर ट्रेन सुटण्यापूर्वी 15 मिनिटं अगोदर तुमचं सामान तुमच्या डब्यापर्यंत पोहचवलं जाईल. याशिवाय रेल्वे गाडी डेस्टिनेशन स्टेशनवर पोहोचल्यानंतर तुमचं सामान पुढच्या तीन तासात तुमच्या घरापर्यंत पोहचवलं जाईल. त्यासाठी प्रवाशाला एका बाजूचे एका बॅगसाठी 125 रुपये द्यावे लागतील. तर डेस्टिनेशन स्टेशनपासून सामान तुमच्या घरी पोहचवण्यासाठी वेगळे 125 रुपये द्यावे लागतील.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील हिंसक आंदोलक; अण्णा हजारेंनी मांडलं ‘हे’ सडेतोड मत!
- विदर्भाचा मागासलेपणा गोसीखुर्दच्या पाण्याने धुऊन काढणार; मुख्यमंत्र्यांचे विदर्भवासीयांना आश्वासन
- ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात संगनमत करून आर्थिक लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल करा- मनसे
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची ‘बी’ टीम; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
- शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

