Share

संजय राठोड गायब नाहीत असा दावा करणारे अजितदादा ‘या’ प्रश्नांची उत्तरे देतील काय ?

Published On: 

पुणे : राज्यात सद्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी संबध असल्याचे आरोप होत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते मेहबूब शेख यांचे नाव देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याने राज्यातील महिला सत्ताधारी नेत्यांपासून सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या ११ दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे.या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापलेले आहे.

संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राठोड गेल्या काही दिवसांपासून गायब असून त्यांचा फोनही लागत नाही. मंत्रिमंडळाची  17 फेब्रुवारी रोजी  बैठक झाली या बैठकीला राठोड यांनी दांडी मारली. गेल्या ११ दिवसांपासून राठोड हे नॉट रिचेबल आहेत पण मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं आहे.

दरम्यान, संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत. संजय राठोड लवकरच ते समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून एक दोघांना ताब्यात घेतलं जात आहे. पोलीस काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचं नाव आलं की वेगळी प्रसिद्धी मिळत असते, पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य येईल, असंही अजित पवार म्हणालेत.

दरम्यान,राज्यातील वनमंत्री अश्या पद्धतीने गायब होणे हे आश्चर्यकारक आहे. एवढे दिवस उलटून गेल्यावर देखील कोणतीही माहिती समोर येत नसल्याने चव्हाण कुटुंबियांची देखील बदनामी होत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, जर राठोड संपर्कात असल्याचे पवार सांगत आहेत तर मग ते जनतेच्या आणि माध्यमांच्या समोर का येत नाहीत असा बेसिक प्रश्न उपस्थित होत आहे. ते कोण लोकं आहेत ज्यांच्या राठोड संपर्कात आहेत हे सुद्धा पुढे यायला हवे कारण राजकीय नेत्याचा सहभाग असल्याने हे प्रकरण दडपून टाकले जाईल अशी सुद्धा चर्चा आहे.

वनखात्याच्या कारभाराचे कामकाज मंत्री नसल्याने कसे पुढे जाणार ? संजय राठोड हे गायब नाहीत तर मग ते कुठे आहेत? ते कुणाच्या संपर्कात आहेत ? या प्रकरणाला दडपण्याच्या कामात तर ते व्यस्त नाहीत ना ? सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का ? सर्वसामान्य मुली यापुढे राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवू शकतील का ? महाराष्ट्रातील मुली सुरक्षित आहेत का ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!