Share

‘मौत का कुआँ’ बनलेल्या ‘त्या’ विहिरीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचेही काम सुरू

Published On: 

जालना : जालना- देऊळगाव राजा महामार्गावर जामवाडीजवळ वनवे वाहतूकीमुळे एका विहिरीत दोन कार जाऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनाने वेगाने हालचाल करत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे रखडलेले काम सुरु केले आहे. या ठिकाणी एका हॉटेल व्यावसायिकाने रस्त्याच्या कामाला विरोध केला होता. मात्र, डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी बैठक घेऊन संबंधित व्यावसायिकाला समज दिली. त्यानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे.

जालना ते देऊळगाव राजा या पंचवीस किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आजही रस्त्याचे छोटे-छोटे तुकडे अर्धवट अवस्थेत आहेत. पुलांचे देखील काम सुरू आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना या रस्त्यावर नाही. त्यामुळे लहान-मोठे अनेक अपघात या मार्गावर होतात.

दोन वेळा कार विहिरीत जाऊन चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर बांधकाम विभागाने याठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले आहेत. शिवाय विहिरीजवळ रस्त्याच्या कडेने असलेला मातीचा ढिग काढून त्याठिकाणी लोखांडी पोल आणि दोन्ही बाजूंनी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!