Share

बेकरी व्यवसायिकाला लुटणारे तिघे गजाआड

Published On: 

औरंंगाबाद : दुचाकीने प्रवास करणाNया बेकरी व्यवसायीक तरुणाला पाठमागून आलेल्या ट्रीपल सिट दुचाकी चालकांनी लाथ मारून खाली पडून मारहाण करत त्याच्या खिशातून बळजबरीने २ हजार रोख आणि मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दोन तरुणांसह एका विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.

दिपक उर्फ जुली राजेंद्र चव्हाण (वय २१, रा॰हनुमान चौक,चिकलठाणा), अझहर खान उर्फ माया आझाद (वय २४, रा. ईस्टो कॉलनी, हिनानगर, चिकलठाणा) आणि एक १६ वर्षीय बालकाचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे समोर आले आहे. बेकरी साहित्याची खरेदी करण्यासाठी शेख अन्वर शेख अकबर (वय ३०रा. चितेगांव ता॰पैठण) हे ११ फेब्रूवारी रोजी शहरात आले होते.

रेल्वे स्टेशन मार्ग ते दुपारी तीनच्या सुमारास चितेगावकडे जात असतांना त्याच्या दुचाकीला पाठी मागून आलेल्या ट्रिपलसिट दुचाकीस्वारांनी धडक दिली होती, त्यानंतर त्यांनी मारहाण करीत शेख अन्वर यांच्या खिशातील २ हजार रूपये व १६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसाकावून पोबारा केला होता. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आधाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाने लुटमारी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!