अमरावती : राज्यातील विविध प्रश्नांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लक्ष्य केलं आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणाच नियम मोडून एसटीने प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ खुद्द नवनीत राणा यांनी ट्विट केला आहे. मेळघाटातील आदिवासी नागरिकांची व्यथा त्यांनी मांडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री महोदय जागे व्हा ,मातोश्रीच्या बाहेर निघा मेळघाटातील आदिवासीच्या व्यथा-वेदना जाणून घ्या’ असं म्हणत त्यांनी एसटी बसची अवस्था व त्यामुळे नागरिकांना कराव्या लागणाऱ्या अडचणींवर त्यांनी भाष्य केलं आहे.
मात्र, सप्टेंबरमध्ये सुरु करण्यात आलेल्या एसटी प्रवासासाठी सामान्य नागरिकांना काही नियम पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनिटायझर बाळगणे आवश्यक आहे अथवा प्रवास करता येणार नाही असं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. मात्र या नियमांचा विसर खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना पडलेला दिसत आहे.
एसटी बस सुरु असताना दरवाजा उ ठेऊन त्या व्हिडीओमध्ये समस्या सांगत आहेत. मात्र त्यांनी मास्क देखील घातलेला नाही. त्यामुळे सामान्यांना वेगळा नियम आणि खासदार-आमदारांना वेगळी वागणूक का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांनी वीस-वीस वर्ष जुन्या बस, त्यांची झालेली दुरावस्था यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी लक्ष देण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, नियमांचं उल्लंघन करत प्रवास केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल आता विचारला जात आहे.
https://twitter.com/NavneetKRana/status/1314611120322285569
महत्वाच्या बातम्या :-
- ‘पुण्याची जनता सिद्ध करेल, अजित दादा हेच तुमचे बाप आहेत’ : अमोल मिटकरी
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- विश्वस्तांनी मोडले नियम; चोरी होत नसलेल्या शनिशिंगणापुरात चोरून दर्शन!
- #Corona : कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये लातूर पॅटर्न ठरतोय आदर्श
- सरकारी निधीतून चालवले जाणारे मदरसे नोव्हेंबरपासून बंद करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

