Share

सरकारी निधीतून चालवले जाणारे मदरसे नोव्हेंबरपासून बंद करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

गुवाहाटी : धर्मनिरपेक्ष देशात सर्वसामान्य जनतेच्या पैशातून धार्मिक शिक्षणासाठी निधी देणं योग्य नसल्याचं सांगत मदरसे बंद करण्याचा मोठा निर्णय आसाम सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. आसाम सरकार मदरसे आणि संस्कृत शाळा देखील बंद करण्याच्या तयारीत आहे.आसाम सरकारचा हा निर्णय चांगलाच वादात सापडण्याची शक्यता आहे.

आसाम सरकारचे मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार,नोव्हेंबर महिन्यापासून आसाममध्ये सुरू असलेले सरकारी मदरसे बंद केले जाणार आहेत यासंदर्भात सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्वजनिक पैशांचा वापर धार्मिक शास्त्र आणि ग्रंथ शिकवण्यासाठी आता यापुढे सरकार खर्च करणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

या संदर्भात एक पत्रकही जाहीर करण्यात आलं असून भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे अनुकरण आता इतर कोणती राज्ये करतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. तसेच आता या निर्णयावर मुस्लीम तुष्टीकरणाची राजनीती करणारे पक्ष तसेच भाजप विरोधक देखील नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!