पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पुणे महापालिकेतील सत्ता आणि प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडीचं निमित्त साधून पाटलांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘अजित पवार यांना जर पुणे महापालिकेच्या सत्तेविषयी काही स्वप्नं पडत असतील तर त्यांनी ही स्वप्न पाहण्यात जास्त जास्त ऊर्जा वायाला घालवू नये. कारण त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी ती म्हणजे आम्ही पण त्यांचे बाप आहोत.’ असा जोरदार टोला लगावला आहे.
यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवर घणाघात केला आहे. ‘काल भाजपाच्या एका महाशयाने, “आम्ही तुमचे बाप आहोत” असे वक्तव्य केले. त्यांच्या माहिती करता 2019 चे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2022 चाली पुणे मनपात पुण्याची जनता अजित दादा पवार हे तुमचे बाप आहेत हे सिद्ध करून दाखवेल काळजी करू नका.’ अशी फेसबुक पोस्ट करून त्यांनी भाष्य केलं आहे.
https://www.facebook.com/amol.mitkari.9/posts/1843193362485227
अजित पवारांनी सत्तेचं स्वप्न पाहण्यात आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नये : चंद्रकांत पाटील
पुणे महानगरपालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षांची निवड पार पडली यानंतर एका कार्क्रमात भाजप पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. “पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १५ पैकी ११ ठिकाणी भाजपाने अध्यक्षपद मिळवत वर्चस्व मिळवले आहे. आणि एक जागेवर काँग्रेसकडे गेली आहे. अन्य ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. मात्र प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्वच जागांवर भाजपाचे अध्यक्ष व्हायला हवे होते.. मात्र, तसे घडले नाही. परंतु, महापालिकेच्या सत्तेच्या बाबतीत जर अजित पवार यांना काही स्वप्नं पडत आहे. मात्र त्यांनी ती पाहण्यात आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नये. कारण आम्ही देखील तुमचे बाप आहोत.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

