Share

#Corona : कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये लातूर पॅटर्न ठरतोय आदर्श

Published On: 

🕒 1 min read

लातूर – जिल्हयात 18 हजार 143 रुग्ण् पॉझिटिव्ह असून कॉन्टेंक्ट ट्रेसींगच्या माध्यमातून 3 लाख 90 हजार 31 व्यक्तींची कॉन्टक्ट ट्रेसिंग करण्यात आलेली आहे. यामध्ये 94 हजार 757 व्यक्ती या हायरीस्क कॉन्टॅक्ट होत्या तर 2 लाख 61 हजार 289 व्यक्ती या लोरिस्क कॉन्टॅक्टस् असल्याने लातूर जिल्हा राज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये दुसरा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परीषद लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

कोविड-19 बाधीत रुग्णांच्या निकट सहवासींताचा सर्वे करुन रुग्णांचे हायरीस्क, लोरीस्क कॉन्टेंक्ट शोधून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार हायरीस्क सहवासीतांचे संस्थातात्मक विलगीकरण करुन आवश्यकतेप्रमाणे स्वॅब तपासणी करण्यात आले. व त्यामधून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना व त्यांच्या सहवासीतांचे विलगीकरण करण्यात आले. तसेच कोविड-19 बाधीत रुग्णांचे असलेले लोरीस्क सहवासीतांना गृह विलगीकरण करण्यात आले, व त्यांचे पुढील 14 दिवस आरोग्य कर्मचारीच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करुन आवश्यकतेप्रमाणे संदर्भ सेवा देण्यात आली.

या कॉन्टेक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून हायरीस्क कॉन्टक्टस्च्या तपासणीतून कोविड-19 रुग्ण् लवकरात लवकर शोधून काढण्यात आले. या तपासणीतून जे रुग्ण् पॉझिटिव्ह आले, त्यांचे तात्काळ संस्थात्मक अथवा गृह अलगिकरण करुन उपचाराखाली आणण्यात आले. जे व्यक्ती लोरिस्क कॉन्टक्टस् होते त्यांचे गृह विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे Transmission chain लवकर खंडीत करण्यामध्ये यश आले, त्यामुळे रुग्णांची संख्या नियंत्रीत ठेवण्यासाठी फार मोठी मदत झाली व पर्यायाने मृत्यूदर कमी होण्यासाठी मदत झाली.

कोविड-19 या आजाराचा प्रसार होऊ नये व संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व नियमीत तोंडावर मास्क वापरावा, शारिरीक 6 फूटाचे अंतर ठेवावे, वारंवार हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जाण्याचे टाळावे असे आवाहन जिल्हा परीषद अध्यक्ष राहूल केंद्रे ,जिल्हा परीषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती श्रीमती भारतबाई सोळुंके, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी श्रीमती डॉ. मोनिका पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष हिंडोळे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!