Share

विश्वस्तांनी मोडले नियम; चोरी होत नसलेल्या शनिशिंगणापुरात चोरून दर्शन!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली आहेत. लॉकडाऊन नंतर राज्यात टप्प्याटप्याने अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, अद्याप राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

शनिशिंगणापूर येथील स्वयंभू शनिदेवाचे मंदिर बंद असले तरी अनेक दिवसांपासून काही विश्वस्त व कर्मचारी आपआपल्या मर्जीतील भाविकांना बरोबर घेवून दर्शन घडवून आणत आहेत. चोरी होत नसलेल्या गावात दर्शन मात्र चोरुन होत असल्याचे दिसत आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. १७ मार्च रोजी शनिशिंगणापूर येथील विश्वस्त मंडळाने मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीचे काही महिने हा नियम कटाक्षाने पाळला जात होता.

मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून काही विश्वस्त आपल्या मर्जीतील भाविकांना घेवून त्यांचे खास दर्शन घडवित आहेत. ही पध्दत पाहून काही कर्मचारी आरतीचे लाइव्ह दर्शन काही भाविकांना मोबाईलच्या व्हिडिओ काॅलद्वारे घडवू लागले. या सर्व प्रकाराने स्थानिक ग्रामस्थ व परीसरात नाराजी व्यक्त होत आहे.

देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त मंदिरात कुणालाही प्रवेश द्यायचा नाही. असे विश्वस्त मंडळ बैठकीत ठरले असताना चोरुन-लपून होत असलेल्या दर्शनाची चर्चा होत आहे. देवस्थान प्रशासनाने मुख्य दरवाजा जवळ एक स्क्रीन लावून भाविकांसाठी बाहेरूनच दर्शन सुरु केले आहे.

या निर्णयाचे अनेक भाविकांनी कौतुक केले . राज्यातील तसेच बाहेरील अनेक भाविक तेथे दर्शन घेत आहे . परंतु दोन ते तीन अतिउत्साही विश्वस्त आप आपल्या मर्जीतील भाविकांना सोबत घेऊन मंदिरात जात आहे. काही दिवसांपूर्वी तर एका विश्वस्तांने जिल्ह्यातील दोन युवा नेत्यांचे खास दर्शन घडवून आणले होते, अशीही माहिती आहे. परंतु आता चोरुन होत असलेल्या दर्शनाबद्दल शनि भक्तांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!