🕒 1 min read
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी दिल्लीत काही बैठकाही झाल्या. विविध केंद्रीय मंत्र्यांच्या मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी या बैठका होत्या.
केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्यांचही सांगितलं जात आहे. खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू तर चांगली कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना बढती दिली जाईल अशी देखील शक्यता आहे.
उत्तर प्रदेशसह पुढील वर्षी होणाऱ्या महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुकांसाठी मोदी सरकार जोमाने तयारी करत आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान,केंद्रात सध्या शिवसेना, अकाली हे दोन मित्रपक्ष बाहेर पडल्याने आणि रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने तीन कॅबिनेट मंत्रिपदं रिक्त आहेत तर तर सुरेश आंगडी यांच्या निधनामुळे एक राज्यमंत्रीपद रिक्त आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर हा कॅबिनेट विस्तार राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असणार आहे.
शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या खात्याचा अतिरिक्त भार हा प्रकाश जावडेकर यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातून मोदी कुणाला मंत्रिमंडळात घेणार याचीही त्यामुळे उत्सुकता असेल. याशिवाय महाराष्ट्रातील महिला खासदारांपैकी एका खासदाराला अकाली दलाने सोडलेल्या मंत्रीपदी संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. जर असे झालेच तर खा. प्रीतम मुंडे आणि हीना गावित यांची नावे आघाडीवर असणार आहेत. याशिवाय पूनम महाजन यांची सुद्धा मंत्रीपदी वर्णी लागू शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- नव्या इंनिगंसाठी ‘राणादा’ सज्ज; न्यु लुक्सची सर्वत्र चर्चा.
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
