Share

इंधन दरवाढीचा अनोखा निषेध, वकिल महिला घोड्यावर बसून न्यायालयात दाखल

Published On: 

बीड : केंद्र सरकारने इंधनाच्या तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्याचे उपाध्यक्ष अॅड.हेमा पिंपळे यांनी अनोखे आंदोलन केले. घोड्यावर बसून त्या न्यायालयात आल्या. दरवाढीमुळे वाहन चालवणे परवडत नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी पिंपळे यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

राज्यात तसेच देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक शहरांत पेट्रोलने शंभरी पार केल्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कित्येकांना स्व:तच्या खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचे भावही दिवसेंदिवस वाढत आहेत. फक्त फेब्रुवारीमध्ये तीन वेळा गॅसचे भाव वाढल्यामुळे गृहिणी त्रस्त आहेत.

परिणामी नागरिकांकडून केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला जातोय. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हेमा पिंपळे यांनी दरवाढीच्या निषेधार्थ आगळेवेगळे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून त्या न्यायालयात घोड्यावर बसून आल्या. या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हेमा पिंपळे या बीड जिल्हा न्यायालयात वकील आहेत. महिला अत्याचार, इतर सामाजिक मुद्द्यांबाबत त्या नेहमीच अग्रेसर असतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!