Share

कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा

Published On: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक दुकाने, आस्थापनांवर मराठी भाषेतील फलक लिहायलाच हवा. कन्नड भाषेतील फलक दिसल्यास फलक फाडून दुकान बंद करू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे.

शहरात काही दुकानांवर कन्नड भाषेतील फलक लावल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी फलकांना काळे फासले. तसेच फलक फाडून टाकले. शहरात अंबाबाई मंदिर परिसरात अनेक ठिकाणी दुकान, धर्मशाळा, लॉजिंग, हॉटेलच्या नावाच्या पाट्या कन्नडही ठेवण्यात आलेल्या होत्या.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशासह देशभरातून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या कारणामुळे कन्नड भाषेत फलक लावण्यात आले होते. मात्र, आता शिवसेनेच्या वतीने हे सर्व फलक काढण्यात आले. याबाबतसंजय पवार म्हणाले की, महाराष्ट्राची सीमा सोडून गेल्यानंतर एकही मराठी भाषेचा फलक दिसत नाही. परंतु येथील काही व्यावसायिकांना लाज वाटली पाहिजे. येथून पुढे कन्नड भाषेतील फलक दिसल्यास दुकाने बंद करण्यात येतील असा इशारा कोल्हापूर शिवसेनेने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!