Share

वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?

Published On: 

मुंबई-संपूर्ण राज्यभरात सध्या एका पोलीस अधिकाऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. मनसुख हिरेन प्रकरणी भाजपने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली आहे.

ठाकरे सरकार वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने आपल्या स्टेटमेंटमध्ये एपीआय सचिन वाझे यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र एटीएसचे अधिकाऱ्यांकडून त्यांची पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता असताना आता वाझेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानंतर (एटीएस) आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) वाझेंची चौकशी करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सत्ताधारी राजकीय नेते वाझे यांच्यासाठी जोरदार बॅटींग करत असून मुख्यमंत्री स्वतः यात पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. मात्र हा तपास जर एनआयएकडे देण्याचा डाव असेल तर त्यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. आम्हीही या प्रकरणाचा कसून तपास करून सर्व काही बाहेर काढू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिला आहे.

यानंतर कॉंग्रेस,राष्ट्रवादी हि देखील वाझे काहीशी अशीच भूमिका घेतली. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील या मुद्द्यावरून भाजपवर तोफ डागली आहे. ATS कडून तपास काढून घेऊन NIA कडे देण्याची मोदी सरकारची एवढी घाई कशाला? काही अडचणीचे उघड होईल भीती वाटते का? भीमा-कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिस चांगले तपास करत आहे म्हणणारी NIA सरकार बदलताच पुणे पोलिसांकडून तपास काढून घेते. सुशांत सिंह प्रकरणात CBI अजून गप्प आहे. काळंबेरं दिसते असे सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान,काल फडणवीस यान याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. ज्यांच्याविरुद्ध एवढे पुरावे आहेत, त्यांना उद्धव ठाकरे डिफेंड करत आहेत. मला समजत नाही की अशी कोणती माहिती त्यांच्याकडे आहे की त्यांना वाचवलं जात आहे? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!