Share

संशय अधिकच बळावला : मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टमच्या ठिकाणी सचिन वाझे का उपस्थित होते ?

Published On: 

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली व धमकीपत्र असलेली कार आढळल्याने खळबळ उडाली असतानाच शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. मनसुख बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.

दरम्यान,महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घटनेसंबंधी शंकेला अनेक पुरावे समोर आल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं घर ठाण्यात आहे. जी गाडी चोरी झाली, ती सुद्धा ठाण्यातच सापडली. इतकंच नाही, जी गाडी चोरी होऊन ज्या मार्गानं आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमलं आहे. हे आश्चर्यकारक आहे, असं फडणवीस म्हणाले होते.तर दुसरीकडे मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे.

दरम्यान, भाजपाचे नेते आ.आशिष शेलार यांनी आणखी एक शंका उपस्थित केली आहे.“सचिन वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. यात काही तरी काळंबेरं असल्याचं पुन्हा गडद होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली जावी,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!