मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. पहिल्या लाटेतून अधिक रुग्ण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळल्याने आरोग्य व्यवस्थांवर मोठा ताण निर्माण झाला होता. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.
दरम्यान, कोरोना काळात राज्यावर चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि इतर मोठ्या समस्यांची भर देखील पडली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. अशा संकटकाळात मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून परिस्थिती हाताळणे अपेक्षित असताना ते ‘मातोश्री’तच बसून राहिल्याची टीका विरोधकांनी केली होती.
https://www.facebook.com/RaviRanaMLA/posts/4012629275479324
दरम्यान, आता आमदार रवी राणा यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ते वाढीव वीजबिल, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांबाबत योग्य निर्णय घेण्यासाठीचे एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी मंत्रालय गाठले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात नसल्याने त्यांनी ते निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाच्या दरवाजासमोर लावले. मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच माघारी परतावं लागल्याने त्यांनी निवेदन व कार्यालयाबाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या पोस्टला त्यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी केबिनचा चेहरा पाहिलेला नाही, केबिनने मुख्यमंत्र्यांचा चेहरा पाहिला नाही,’ असं कॅप्शन देत मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं…’ रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- “राज्यसरकार व प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या लपवत आहे, याचा भांडाफोड १ जूनला करणार”, आ. निलंगेकरांचा इशारा
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल


