Share

अखेर त्या गागलेगावच्या लाचखोर तलाठ्याला अटक

Published On: 

नांदेड: एकीकडे कोरोना महामारीमुळे सामान्या जनता हैरान आहे तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी लाच मागत आहेत, मंदिराच्या जमिनीची नोंद सात बारावर घेण्यासाठी लाच घेणाऱ्या गागलेगावच्या तलाठ्याला अखेर जेरबंद करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला यश आले आहे. तसेच सदरील तलाठी सतत पैश्यांची मागणी करत होता. या आधी देखील त्याच्यावर अनेकवेळा लाच घेतल्याचा आरोप देखील आहे.

बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील श्रीकृष्ण मंदिर देवस्थानला दानपत्राद्वारे मिळालेल्या जमिनीची नोंद सातबारावर करावयाची होती. त्यासाठी मंदिर संस्थानच्या अध्यक्षाने याबाबत गावचे तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता कुलकर्णी याने १५ हजारांची लाच मागितली. १८ मे रोजी या लाचेपैकी १० हजार रुपये स्वीकारलेही. उर्वरित ५ हजार रुपयांची मागणी कुलकर्णी याने सुरुच ठेवली. त्यामुळे मंदिर समितीच्या अध्यक्षाने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधून तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा करत या पथकाने २५ मे रोजी पंचासमक्ष केलेल्या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तसेच उपरोक्त कामासाठी तडजोडी अंती ४ हजार रुपये स्वीकारण्याचे तलाठी कुलकर्णीने मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून दि.२७ मे रोजी तहसील कार्यालय बिलोलीच्या प्रांगणात सापळा रचून तलाठी कुलकर्णी याला लाचेची उर्वरित रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. शासकीय अधिकारी/ कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबधाने काही माहिती असल्यास किंवा शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!