जालना : एका युवकावर पोलिसांनी अक्षरशः लाठ्या तोडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. उपविभागीय अधिकारी शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ काढला म्हणून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप, मारहाण झालेले भाजयुमो कार्यकर्त्ये शिवराज नारीयलवाले यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर कोणताच गुन्हा तसेच तक्रार नसताना त्यांना नाहक मारहाण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दीपक हॉस्पिटलमध्ये बहिणीचे रिपोर्ट बघण्यासाठी गेले असता, त्यांच्याच समाजातील एका जिम चालकाचा सात एप्रिल रोजी अपघात झाला होता. त्याला देखील तिथेच भरती करण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये जिम चालकाचे मित्र तसेच नातेवाईकांची गर्दी वाढत असल्याने हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणली. तसेच नगरसेवक देवावले यांच्याशी उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर हे अर्वाच्च भाषेत संभाषण करू लागले.
चुकीची भाषा शैलीचा वापर खिरडकर करत असल्यामुळे, नारीयलवाले यांनी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. हि बाब खिरडकर यांच्या अंगरक्षकाच्या निदर्शनास आली. त्यांनी हि माहिती खिरडकर यांना देताच त्यांनी नारीयलवाले यांचा मोबाईल हिसकावला आणि त्यांना नोंदणी कक्षाच्या शेजारी नेत सहकाऱ्यांसह मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता कोणताच गुन्हा न दाखल करता. दुसऱ्या दिवशी त्यांना सोडून दिले.
तर त्यांचा मोबाईल दोन दिवस ताब्यात ठेऊन शिवीगाळ केलेले चित्रीकरण डिलीट करून त्यांना मोबाईल वापस देण्यात आला. परंतु, नारीयलवाले यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून खिरडकर यांचा २६ सेकंदाचा व्हिडीओ रिकव्हर केला असल्याची माहिती, शिवराज नारीयलवाले यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं…’ रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- “राज्यसरकार व प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या लपवत आहे, याचा भांडाफोड १ जूनला करणार”, आ. निलंगेकरांचा इशारा
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
