मुंबई : स्वप्नील लोणकर या युवाने एमपीएससी परीक्षा पास करूनही अजून मुलाखत होत नाही आणि त्यामुळे नोकरी लागत नाही या सरकारी ढिसाळ कारभाराला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे सरकारचा गलथान कारभार समोर आला असून राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे.
पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा,मुलाखत अश्या प्रकारे काठीण्याची उच्च पातळी पार करत एमपीएससी ची तयारी करीत असणारा प्रत्येक विद्यार्थी पुढे जात असतो, त्यानंतर त्याच्या पदरी यश प्राप्त होणार अशी त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची अपेक्षा असते. परंतु जर सरकारच्या निष्काळजी धोरणामुळे वर्षामागून वर्ष लोटूनही परीक्षाच होणार नसतील,त्यांच्या मुलाखती रखडणार असतील तर त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या भवितव्याची होणारी राख रांगोळी याला जबाबदार कोण? हा प्रश्न आज राज्यातले हजारो युवा विचारत आहेत. त्यामुळे स्वप्निल लोणकर याची ही आत्महत्या नसून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा नाहक बळी आहे अशी भावना आज तमाम युवा वर्गामध्ये आहे.
एकेकाळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी आवाज बुलंद करणारे मंत्री बच्चू कडू, आमदार रोहित, राजू शेट्टी, पवार, रविकांत तुपकर,मंत्री धनंजय मुंडे, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज सत्तेत आल्याने कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवा वर्गाच्या समस्यांसाठी मोर्चा देखील काढला होता मग आता ते स्वतः मंत्री असताना आक्रमक आणि ठोस भूमिका का घेत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे. या विद्यार्थ्यांना आज मोठ्या अपेक्षा या नेत्यांकडून असताना हे नेते आज गप्प का बसले आहेत असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार केवळ दोन सदस्यांवर सुरू असल्याने, प्रशासकीय कामकाज करण्यासोबतच परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास उशीर होत आहे. सरकारने काल स्पर्धा परीक्षा मधील समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन केली आहे, पण ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे, त्याची माहिती प्रसारित केली नाही, तसेच या समितीमध्ये कोण सदस्य असणार आहेत याची देखील माहिती नाही…ही समिती किती दिवसात आपला अहवाल सादर करणार याची माहिती दिली नाही. त्यामुळं ही समिती नक्की कोणत्या विषयावर स्थापन केली आहे,त्याची सविस्तर माहिती दिली नाही. त्यामुळे ह्या समिती स्थापन करण्यावरून विद्यार्थी वर्ग नाराज झाला असून त्यांचा अजून संभ्रम वाढला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लागावेत अशीच अपेक्षा हे विद्यार्थी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकार विरोधकांना घाबरले ?
- लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माहीचं साक्षीला खास गिफ्ट! पाहा फोटो
- दादा कोंडकेंच्या घराचा फोटो शेअर करत प्रथमेश परबने वेधले अनेकांचे लक्ष्य
- हरभजनच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ ; वाढदिवसादिवशी मिळालं खास गिफ्ट
- स्ट्राईक रेटवर टिका करणाऱ्यांना मितालीने खडसावले, म्हणाली…


