Share

‘सरकारनं घोषणा केली दहा हजारांच्या मदतीची मात्र शेतकऱ्यांना मिळाले फक्त दोन हजार’

Published On: 

🕒 1 min read

बीड –सरलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी दहा हजार रूपये मदतीची घोषणा ठाकरे सरकारने केली. त्यानुसार प्रशासकिय पातळीवर पैसे वाटपास सुरूवातही झाली. मात्र यामध्ये गंमत असुन घोषणा दहा हजाराची शेतकऱ्यांच्या हातावर मात्र कुठे दोन हजार तर कुठे चार हजार पैसे सरकार ठेवत आहे. तीन महिने झालं तरी अद्याप पन्नास टक्के शेतकऱ्यांनाही मदत मिळालेली नाही. सरकार शेतकऱ्यांना देताना असा भेदभाव का करतं?हा प्रश्न भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरीत राज्याच्या काही जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली ज्यामुळे खरीपाची पिके नेस्तनाबुत झाली होती. शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले. जमिनी खरडुन गेल्या. जनावरे मेली. फार मोठं संकट शेतकऱ्यांवर आलं. मायबाप सरकार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मराठवाड्यात येवुन परिस्थितीची पाहणी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीची नदी आणि ओढे झाले. ही परिस्थिती आणि विदारक चित्र मुख्यमंत्र्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं. दुसऱ्या बाजुने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीचा दौरा करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी दहा हजार रूपये आर्थिक मदत देवु घोषणा करून तीन महिने झाले.

दिवाळीलाच देवु असं सांगितलं होतं. आज 2021 जानेवारी उघडला तरी पन्नास टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत आणि सरसकट मदत वाटप न करता हे सरकार शेतकऱ्यांची दिशाभुल करत आहे. आजही एका जिल्ह्यात काही तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळत असुन कुठे दोन हजार तर कुठे चार हजार याप्रमाणात वाटप सुरू आहे. खरं तर दहा हजाराचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता.मात्र राज्याचे मुख्यमंत्रीच दिलेला शब्द पाळत का नाहीत? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

या प्रकारामुळे शेतकरी संतापला असुन जो शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला तेवढी मदत करावी.शेतकऱ्यांच्या हातावर दोन हजार रूपये ठेवणं याचाच अर्थ शेतकऱ्यांची चेष्टा ठाकरे सरकार करत आहे. फसवणुक करत आहे. एकीकडे संकटात सापडलेला शेतकरी आणि दुसरीकडे अशा प्रकारची क्रुर चेष्टा हे सरकार शेतकऱ्यांचं दुष्मन आहे नक्कीच.मराठवाड्यात पंचेवीस लाख हेक्टर जमिनीचं नुकसान आणि पिके अतिवृष्टीने गेलेली होती. औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातुर, बीड, उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. मात्र मदत मिळताना हे सरकार भेदभाव करत आहे. किमान शेतकऱ्यांना जो शब्द दिला तेवढी तरी मदत द्यावी अशी कुलकर्णी यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!