🕒 1 min read
चेन्नई : घरात काम करणाऱ्या महिलांची काम हि कितीतरी वेळा दुर्लक्षित होताना दिसतात. गृहिणी तर घरातच असतात. ‘त्यांना कुठे, काय काम असत किंवा त्या घरात बसून आरामच तर करतात’. अशी वाक्य आपण बर्याचदा ऐकत असतो. तसेचत्यांनी केलेल्या कामाचे मूल्य होत् नाही. यावर अनेक विविध संघटनांनी आतापर्यंत आवाज उठवला आहे. आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. तो कमल हसन यांच्या मक्कल नीधी मय्यम या पक्षाच्या जाहीरनाम्यात तामिळनाडूतील गृहिणींना आता महिन्या अखेरीस आर्थिक वेतन देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
यासंबंधी पक्षाच्या वतीनं सात कलमी सुशासन आणि आर्थिक अजेंडा मांडण्यात आला आहे. यामुळे महिलांची प्रतिष्ठा वाढण्यास मद्त होईल. कारण घर सांभाळून मुलांना संभाळण हे खरच खूप कठीण काम आहे. यामध्ये पण खूप मेहनत घ्यावी लागते. गृहिणींची ९०% काम तर दुर्लक्षित केली जातात. पण आत्ता या कामाला हि महत्व दिले जाणार आहे त्यांना हि वेतन दिले जाणार आहे.
कॉग्रेस नेते शशी थरुर यांनी कमल हसन यांच्या या निर्णयाला आपला पाठिंबा दाखवला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले कि गृहिणींच्या कामाला आर्थिक वेतन देण्याच्या कमल हसन यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे गृहिणींच्या सेवेला मूल्य मिळेल आणि समाजात त्यांच्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. तसेच यामुळे महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल.
Glad to see the Supreme Court weigh in on the income value of unpaid housework: https://t.co/YferOWV3XH
‘Conception that housewives don’t add to economic value of household must be overcome’: SC – https://t.co/6hmozH5vtd— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 6, 2021
थोडक्यात सांगायचं तर मक्कल नीधी मय्यम पक्षाने गृहिणींच्या कामाला आर्थिक वेतनाच्या श्रेणीत आणायचं ठरवलं आहे. यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना समान संधी प्राप्त होण्यास मदत होईल.
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांचं कौतुक
- वाढवण बंदराला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – रामदास आठवले
- प्रियंका चोप्राने केली आपल्या आगामी मेगा प्रोजेक्टची घोषणा !
- कॉंग्रेसचे नाराज ११ आमदार NDA च्या वाटेवर, राजकीय भूकंपाची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
