🕒 1 min read
मुंबई – पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास महत्वाकांक्षी ठरणारे स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारे वाढवण बंदर झाले पाहिजे. त्यासाठी स्थानिक मच्छिमार कोळी बांधवांच्या भावना समजून घेऊन त्यांची बाजू केंद्रात मांडू मात्र वाढवण बंदर झालेच पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचा वाढवण बंदराला जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच जाहीर केली.
मनोर येथील सायलंट रिसॉर्ट येथे रिपब्लिकन पक्षाच्या पालघर ठाणे प्रदेश चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ना रामदास आठवले यांनी रिपाइं कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. यावेळी रिपाइं चे सुरेश बारशिंग,अण्णा रोकडे,बीबी मोरे,पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव,ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळाराम गायकवाड,ऍड. ईश्वर धुळे,फारुख दळवी,उल्हासनगर चे उपमहापौर भगवान भालेराव,महेंद्र गायकवाड,अपेक्षा दळवी,बाळकृष्ण गायकवाड आदी अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
माझा पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आहे असा अभिमान बाळगून गावागावात मी रिपब्लिकन चा नारा पोहोचावा असे आवाहन करून मी रिपब्लिकन तू रिपब्लिकन अशी घोषणा रामदास आठवले यांनी यावेळी केली.
रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी येत्या दि.26 जानेवारी पर्यंत पूर्ण करावी त्यानंतर फेब्रुवारी मध्ये पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुक प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. युती मध्ये मित्रपक्षाने जागा रिपाइं ला सोडली तर ती जागा आपल्या ताकदीवर निवडून आणण्याची तयारी ठेवावी.मी लोकसभा निवडणुकित तीन वेळा रिपाइं च्या चिन्हावर निवडून आलो आहे. मित्र पक्षाचे चिन्ह मी कधीही घेतले नाही.त्यामुळे रिपाइं चे स्वतंत्र अस्तित्व मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइं उमेदवारांनी रिपाइं च्या चिन्हावर उभे रहावे.
रिपाइंला स्वतंत्र चिन्ह मिळण्यासाठी 6 टक्के मतदान किंवा 12 आमदार निवडून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी रिपाइं चे उमेदवार उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- कॉंग्रेसचे नाराज ११ आमदार NDA च्या वाटेवर, राजकीय भूकंपाची शक्यता
- सुझुकी लवकरच आणणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत
- तब्बल 45 वर्षे बिनविरोध असलेल्या बार्शी तालुक्यातील आदर्श मळेगावात यंदा होणार निवडणुका
- ‘दानवेंनी फेकाफेकी करू नये, मी स्वतः संभाजीनगर संदर्भात फडणवीसांना चार पत्र पाठवली होती’
- सुझुकी लवकरच आणणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
