औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असतांना शिक्षण विभागाने ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश बजावले आहेत. शाळाच सुरू नाहीत आणि जिथे रेंज नाही तेथे शिक्षण नाही, अशी स्थिती असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा घाट कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे.
ऊसतोडणी मजूर साधारणत: ऑक्टोबरमध्ये साखर कारखान्याकडे जातात. या वर्षी ऊस अतिरिक्त असल्याने एक महिना जास्त साखर कारखाने सुरू राहतील. या क्षेत्रात साधारणत: सहा लाख कामगार असुन त्यातील बहुतांश जण आपापली मुले घेऊन स्थलांतर करतात. कोरोनामुळे या वर्षी शाळा सुरू नव्हत्या तसेच गावात संसर्गाची भीती होती. त्यामुळे मुलांना गावात ठेवणे मजुरांनी टाळले. सर्वेक्षण झाले तरी हंगाम संपत असताना आता या मुलांना शिक्षण कसे देणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात या मुलांना आणण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र तरी राज्यातील बहुतांश स्थलांतर हे बीड जिल्ह्यातून होते. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेले दहा दिवस मार्चमधील कशासाठी, असा प्रश्नही आता विचारला जात आहे. ३० दिवसांपेक्षा अधिक दिवस गैरहजर असणाऱ्या मुलास शालाबाह्य मानले जावे, असे म्हटले आहे. या वर्षी शाळाच उघडलेल्या नाहीत. त्यामुळे पटावरची मुले हजर असे गृहीत धरायचे का, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांकडून सरकारला विचारला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संकेत
- आरएसएसचा स्मगलरांशी काय संबंध ? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शहांना थेट सवाल
- बुमराहचे लग्न आणि जेठालालचा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे काय आहे ? कारण;
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

