मुंबई : ज्याप्रमाणे बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी गुप्त योजना असल्याच्या चर्चा असतात त्याच प्रमाणे क्रिकेटर्स च्या देख्हील जीवनाबद्दल माध्यामांमध्ये चर्चा असतात आता देखील अशीच एका खेळाडूच्या सुट्टी दरम्यान एक बातमी आली आहे. आता भारतीय संघातील आणखी एका मोठ्या खेळाडूचा विवाह होणार आहे.
यामध्ये काही जण गुपचूप लग्न उरकून घेतात तर काही मोठ्या थाटामाटात लग्न करतात. विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, आर.आश्विन यांचा लग्नसोहळा म्हणजे चाहत्यांसाठी एक आकर्षण होतं. आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लवकरचं लग्नबंधनात अडकणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अंतिम चरणात आली असताना अचानक त्याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे.
संजना गणेशन हिचेही नाव बुमराहशी जोडले जात आहे. संजना ही आयपीएलमध्ये क्रिकेट प्रेझेंटर आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या फॅन शोमध्येही दिसून आली आहे. पुण्यातील सिंबॉयसीस आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाची विद्यार्थीनी असलेली संजना बुमराहची जीवनसंगिनी होणार असल्याची कुजबूज चालू आहे.
She will cheer now Mumbai Knight Riders ???????? https://t.co/2UfHoJg4sr
— dK (@DarkKnightRised) March 8, 2021
दरम्यान, आयपीएलमध्ये क्रिकेट प्रेझेंटर आणि आणि अँकर असलेल्या संजना गणेशनचे फोटो कोलकाता नाईड रायडर्सनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोंवर युजर्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. यातला जेठालालची कमेंट असलेला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच अनेकांनी संजना आता कोलकात्याला नाही तर मुंबई इंडियन्सना सपोर्ट करेल, कारण बुमराह मुंबई इंडियन्स कडून खेळतो अशा कमेंटही अनेकांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मंत्र्यांवर आरोपांची सरबत्ती, मात्र फडणवीस सरकारच्या तुलनेत ठाकरे सरकारच्या काळात महिला अत्याचारात घट !
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच, ‘या’ नेत्याचे नाव निश्चित ?
- अजितदादांनी अर्थसंकल्पातून महिलांबाबत केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक ?
- ‘१७ वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाले’ अर्थसंकल्पानंतर शिवाजीराव आढळराव पाटीलांची प्रतिक्रिया
- ‘त्या’ निनावी फोनने वाचले दोघींचे आयुष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

