कोल्हापूर: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने संभाजीराजेंचा गेम केला, अशी टीका करणारे भाजप आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी नुकतीच केली होती. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवेंद्रसिंह राजे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. शिवेंद्रसिंह राजे यांनी स्वत: कितीवेळा पक्षं बदलले आहेत? त्यांच्या घराण्यातील कोणत्या लोकांनी कितीवेळा पक्ष बदललेत आहेत? ते कोणत्या पक्षात गेले होते? मग शिवेंद्रराजे यांना राजकीय पक्षांचं वावडं आहे का? तुम्ही आम्हाला कशाला तोंड उघडायला लावताय, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिवेंद्रसिंह राजे यांना जोरदार सुनावले आहे. संजय राऊत कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीवरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. छत्रपतींच्या गादीविषयी आम्हाला पहिल्यापासूनच आदर होता आणि आजही आहे, असे संजय राऊत म्हणाले. हा विषय छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करु नये. भाजपला इतकेच वाटत होते तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मतं द्यायला पाहिजे होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यसभेची उमेदवारी देताना शिवसैनिकच निवडून जाणार, हे आमचं ठरलं होतं. सुरुवातीपासूनच सामान्य शिवसैनिकांच्या नावांचा शिवसेना विचार करत होती. यामध्ये कोल्हापूरचे संजय पवार आणि नंदूरबारचे पारवे यांचा नावाचा विचार सुरु होता. पारवे हे देखील शिलेदाराप्रमाणे नंदूरबारमध्ये शिवसेनेची लढाई लढत आहेत. अशा शिलेंदारांना विधिमंडळात किंवा संसदेत प्रतिनिधित्व द्यायला हवे, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. याच भूमिकेतून आम्ही संजय पवार यांना संसदेत पाठवण्याचा निर्णय घेतला, असे राऊत यांनी सांगितले.
शिवेंद्रसिंह राजे काय म्हणाले?
“छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या आधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटतंय त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कुणी केला, हे संभाजीराजेंना चांगलंच माहिती आहे. छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

