Share

कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नात सलमान का राहणार ‘गैरहजर’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना सर्वत्र उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र त्यांच्या लग्नसमारंभात सलमान खान हजेरी लावणार नसल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान कतरिना कबीर खानला तिच्या कुटुंबाचा एक सदस्य मानते. तर असं म्हटलं जातं की दिवाळीत त्यांच्याच घरी कतरिना आणि विकीचा रोका झाला. कतरिना त्यांना भाऊ मानते. दुसरीकडे ट्युबलाइट या चित्रपट दरम्यान, कबीर खान आणि सलमानमध्ये वाद झाल्याचे म्हटले जाते. ज्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले. कतरिनाच्या लग्नात सलमान न येण्याच दुसरं कारण म्हणजे डिसेंबर महिन्यात त्यांची बरीच काम आहेत. सलमान त्यावेळी शाहरुखसोबत ‘पठाण’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे. कारण चित्रीकरण सुरु असताना आर्यनच्या अटकेनंतर त्यांना चित्रीकरण थांबवावे लागले. हे सगळं कतरिनाच्या लग्नाच्या तारेखच्या जवळपास होतं. यामुळे सलमान खान त्यांच्या लग्नसमारंभात हजर राहू शकणार नाही, असं बोललं जात आहे.

https://www.instagram.com/p/CV5YE2VtWeK/?utm_medium=copy_link

एका रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत. दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिं’ग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!