नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असतांना त्यांनी अस्पष्टपणे भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. अमरावती बंद शांततेत पार पडल्यानंतर एका राजकीय पक्षाने जिल्हा बंदचा निर्णय घेतला. याचा अर्थ काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य सार्वजनिक शांततेला धक्का बसेल अशा कृत्यातून काढत असून हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलत असतांना पवार म्हणाले की,’त्रिपुरात काहीच घडले नसल्याचे एका महत्त्वाच्या व्यक्तीचे विधान आपण ऐकले. पण बातम्यांमधून तिकडे वाहनाला आग लावलेले दृश्य बघितले. तिकडे काही घडले म्हणून महाराष्ट्रात काही घडायला पाहिजे असे नाही. काही संघटना कुठलाही संबंध नसताना रस्त्यावर येतात. त्यामुळे दोन, तीन ठिकाणी घटना घडल्या. या प्रवृत्तीबाबत लोकांनी विचार करायला हवा. ज्यांनी राज्य चालविले, त्यांनी राज्याच्या हिताला धक्का बसणार नाही, अशी भूमिका घेतली पाहिजे. त्याचे भान संबंधितांना राहिले की नाही अशी शंका यावी, अशी ही स्थिती आहे. तीन-चार राज्यांतील निवडणुका डोळय़ासमोर ठेवून जाणीवपूर्वक हे घडविले जात आहे. त्याचे दुष्परिणाम सामान्य जनता आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होतात. एक दिवसाचा बंद म्हणजे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’केंद्रीय यंत्रणांचे छापासत्र हा नित्याचा भाग बनला आहे. ठरावीक अधिकाऱ्यांमार्फत ठरावीक लोकांना यातना देण्याचा प्रयत्न होत आहे. देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांना काही गोष्टींची पूर्तता करता आली नाही. लक्ष विचलित करण्यासाठी ते या गोष्टी करीत आहेत. या घटनाक्रमात यातना, त्रास, चौकशी होईल. मात्र लोकशाही मार्गाने लोक त्यांना बाजूला करतील.’
महत्त्वाच्या बातम्या
- घुसखोरांना बाहेर काढणार, योग्य लाभार्थ्यांनाच हक्काचे घर मिळवून देणार- चंद्रकांत खैरे
- किरण रावशी घटस्फोटानंतर पुन्हा एकदा सिंगल झाला आमिर खान
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

