मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील दंगली तसेच हिंसाचारप्रकरणी भाष्य केले. तसेच जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते, असा गंभीर आरोप देखील मालिकांनी केला आहे.
यासंदर्भात बोलत असतांना मलिक म्हणाले की,’महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे भाजपचे षड्यंत्र असून, भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी रझा अकादमीच्या कार्यालयात जाऊन बैठकी घेतल्या. तसेच त्याचा पुरावा म्हणून यावेळी मलिकांनी शेलार यांच्या उपस्थितीतील बैठकीचे छायाचित्र दाखविले.
दरम्यान, मलिकांचे आरोप फेटाळून लावत शेलार म्हणाले की,’माझ्या त्या छायाचित्राचा आणि रझा अकादमीच्या छायाचित्राशी संबंध काय? ती बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्या तरी छायाचित्राचा दाखला देऊन आजच्या दंगलीबाबत आघाडी सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर रझा अकादमीसोबतची अशी असंख्य छायाचित्रे आम्हाला दाखवावी लागतील, तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, असेही शेलार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार
- किरण रावशी घटस्फोटानंतर पुन्हा एकदा सिंगल झाला आमिर खान
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

