🕒 1 min read
नवी-दिल्ली : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी आपले पुस्तक ‘सनराईज ओवर अयोध्या’ मध्ये हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काल(१५ नोव्हें.)खुर्शीद यांच्या नैनितालमधील घरावर हल्ला करुन तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर सलमान खुर्शीद यांनी प्रतिक्रिया दिली असून हिंदुत्व काय करायचं पहायचं असेल तर, माझ्या घराचा जळालेला फोटो पाहा, असे ते म्हणाले आहे.
तसेच पुस्तकातील उल्लेख चुकीचा वाटतोय का असे विचारण्यात आले असता खुर्शीद म्हणाले की, ‘अजिबात नाही, अन्यथा मी पत्रकार परिषद बोलावली असती. जे असहमत आहेत त्यांनीदेखील स्पष्ट सांगितलेले नाही. माझे नैनितालमधील घर जाळण्यापर्यंत ते पोहोचले आहेत. यावरुनच मी काय सांगत आहे ते सिद्ध होत नाही का? त्यांचं हिंदुत्व विरोधाभास निर्माण करणारं आहे. त्यांनी जे केले आहे त्यावरुन माझं वक्तव्य योग्य असल्याचं सिद्ध झालं आहे. फक्त फोन किंवा सोशल मीडियावरुन शाब्दिकदृष्ट्या नाही तर थेट घरावर हल्ला करण्यात आला आहे.’
— Salman Khurshid (@salman7khurshid) November 15, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मी साधर्म्य असल्याचं म्हटलं आहे. एकसारखे किंवा समान असल्याचं म्हटलेलं नाही. यामध्ये काही विशेषता असून धर्माचा होणारा गैरवापर मुख्य मुद्दा आहे. जिहादींबद्दल बोलायचं गेल्यास जर इस्लाम माझा धर्म असेल तर मग त्याचा गैरवापर करणाऱ्यांबद्दल मला बोलण्यापासून का रोखलं जातं? सर्व धर्मांना एकत्र आणणे हाच माझा हेतू असून अयोध्या निकालाला पाठिंबा दर्शवत मी तेच करण्याचा प्रयत्न केला होता.’
महत्त्वाच्या बातम्या
- काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार
- नवाब मलिक यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांवर आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ?; अटके पासून अंतरिम दिलासा नाही
- ‘मोदी सरकार आठ दिवसांत ९५ हजार ८२ कोटींचा निधी राज्यांना देणार’
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
