Share

परमबीर सिंह आणि देशमुखांना शोधण्यासाठी आता पोस्टर लावायची का? भाजपाचा संतप्त सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मागील काही दिवसांपासून फरार आहेत. दोघांचाही शोध पोलिसांना लागत नाही. त्यांना शोधण्यासाठी आता राज्यभर पोष्टर लावायची काय? असा संतप्त सवाल करत भाजपाने आघाडी सरकार व पोलिसांवर निशाना साधला आहे.

भाजपाने ट्विटमध्ये पुढे म्हंटले आहे ‘एकेकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या गायब आहेत. तपास यंत्रणा त्यांचा कसून शोध घेत आहेत यांना शोधण्यासाठी आता राज्यात सर्वत्र पोस्टर लावायची काय?’ असे ट्विट भाजपा मुंबई ट्विटर हँडलवरुन केले आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाऊद इब्राहिम चा सहकारी तारिक परवीन याने पोलीस कस्टडीत दिलेल्या जवाबानुसार सिंह यांना आरोपी करण्यात आले आहे. तर माजी गृहमंत्री परमबीर सिंह यांनी माजी सपोनि सचिन वाझे याच्यामार्फत बारचालकांकडून १०० कोटी वसूली प्रकरणात आरोपी आहेत.

मात्र तेव्हापासून परमबीर सिंह व अनिल देशमुख हे दोघेही फरार आहेत. त्यानंतर गुप्तचर विभागाने त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला मात्र ते हाती लागले नाहीत. यावरुन भाजपाने आघाडी सरकार व पोलिसांवर निशाना साधला आहे. या दोघांना शोधण्यासाठी आता राज्यात सर्वत्र यांची पोस्टर लावायची का? असा सवाल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!