Share

मुश्रीफांच्या बचावासाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; म्हणाले, ‘बदनामीचा कट हाणून पाडू’

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर, कोल्हापुरातील वातावरण तापलं असून सोमय्या यांना सोमवारी कोल्हापूरला न जाताच माघारी फिरायला लागलं होतं. मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे देखील मुश्रीफ यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहे. स्थानिक पातळ्यांवर मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची आघाडी आहे. त्यांची राजकीय मैत्री देखील अनेकवेळा दिसून आली आहे. आता सतेज पाटील यांनी किरीट सोमय्यांना इशारा देताना मुश्रीफांना पाठिंबा दिलाय.

मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा दावा पाटील यांनी केला आहे. सोमय्या हे पुन्हा एकदा कोल्हापूरला जाणार असल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर देखील पाटील यांनी भाष्य केलं आहे. ‘इथल्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा,’ असं आवाहन पाटील यांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले, ‘सोमय्यांनी मुश्रीफ साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु मुश्रीफ साहेबांनी यावर खुलासाही केलाय. त्यामुळे खुलासा केल्यानंतर त्यांनी पुन्हा दौरा काढण्याची काही गरज नाही, मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!