🕒 1 min read
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चार दिवसांपूर्वी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन दिली. या विमानतळामुळे कोकणातील पर्यटनवाढीला मोठा फायदा होणार आहे. गेली कित्येक वर्षे चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरु होण्याचे कोकणवासियांचे महत्वाचे स्वप्न रखडले होते.
दरम्यान, ९ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत या विमानतळाचे उदघाटन होणार आहे. या विमानतळाचे श्रेयवाद देखील चांगलेच रंगले असून राणे विरुद्ध शिवसेना असा वाद बघायला मिळत आहे. दुसरीकडे, विमानतळाचे उदघाटन होण्यापूर्वीच प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आपले आहे. कारण विमान सेवेसाठी नागरिकांनी तिकीट बुकिंगला सुरुवात केली आणि अवघ्या तासाभरातच तिकीट बुकिंग फुल्ल झाले.
२० ऑक्टोबरपर्यंतचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले असून कोकणात जाताना तुम्हाला विमान प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर २० ऑक्टोबर नंतरच्या आरक्षणासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. एअर इंडियाकडून एलायन्स एअर कंपनीमार्फत मुंबई – सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग – मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांचा सध्याचा प्रतिसाद बघता येत्या काळात इतर विमान कंपन्या देखील सेवा देण्यास सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे.
तिकीट दर किती ? आणि वेळ किती लागेल ?
मुंबई ते सिंधुदुर्ग या विमान प्रवासासाठी साधारण २५२० रुपये इतका तिकीट दर असेल. तर सिंधुदुर्ग ते मुंबई या विमान प्रवासासाठी 2621 रुपये आकारले जातील. तर, मुंबईहून सिंधुदुर्गात जाणारे विमान हे सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी उड्डाण करेल आणि दुपारी साधारणत: 1 वाजण्याच्या सुमारास चिपी विमानतळावर लँड करेल. यासोबतच सिंधुदुर्ग ते मुंबई या प्रवासासाठी चिपी विमानतळावरून दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी विमान उड्डाण करेल.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- ‘त्या’ रस्त्यावर १७० किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो पण पोटातलं पाणीसुद्धा हललं नाही – गडकरी
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- खामोश.. म्हणणाऱ्या ‘शत्रुघ्न’ यांना आज ही आठवतेय लग्नाची अनोखी कहानी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
