Share

‘…मग हे कसले घंट्याचे बेस्ट CM ?’ निलेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर विखारी टीका

Published On: 

मुंबई : शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन केले. सर्वाधिक जागा येऊन देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं असून भाजपने विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक असलेल्या राणे परिवाराने सरकारसह ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनद्वारे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील बहुतांश रस्त्यांची चांगलीच दुरावस्था झाली आहे. याकडे स्थानिक प्रशासन हे दुर्लक्ष करत आहे. दरम्यान, रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. अशाच मोठ्या खड्ड्यावर अपघात टाळण्यासाठी चक्क वाहतूक पोलीसच तात्पुरत्या उपाययोजना करत असल्याचे दिसत आहेत.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1441313836309487622?s=20

‘हे बघा काय चाललंय महाराष्ट्रात खड्डे बुजवण्याचे काम ट्रॅफिक पोलिस करत आहेत. महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे, एकही वर्ग ठाकरे सरकारवर समाधानी नाही मग कसले घंट्याचे बेस्ट CM. महाराष्ट्राला राज्य सरकार वीस वर्ष मागे घेऊन गेले,’ अशी विखारी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!