Share

‘परवा एका एकराला 18 कोटी दिले; आता लोकं भेटून सांगतात, दादा रस्ता तेवढा आमच्या शेतातून न्या’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील विविधमहत्वाच्या उड्डाणपूल आणि रस्त्यांचे भूमिपूजन आज केले जात आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेते मंचावर उपस्थित होते.

दरम्यान, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहरासह जिल्ह्यात रस्त्यांची विविध कामे सुरु आहेत. रिंग रोड,महामार्ग, रस्ता रुंदीकरण आदी कामांसाठी महत्वाचा टप्पा असतो तो भूसंपादनाचा ! अनेक ठिकाणी आपली हक्काची आणि पिकाऊ शेतजमीन अशा कामांमध्ये जाऊ नये यासाठी शेतकरी संघर्ष करत असल्याचे समोर येते. मात्र, अजित पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना एक वेगळाच किस्सा सांगितला.

ते म्हणाले, ‘रस्त्यांची कामं सुरु असताना भूसंपादन करावं लागतं. मधल्या काळात राज्य सरकारकडून भूसंपादन करताना मोबादला देण्यासंबीचे जे काही निर्णय झाले होते, त्यामध्ये इतर राज्यांपेक्षा आपल्याला अधिक रक्कम संबंधितांना द्याव्या लागायच्या. इथे जमलेल्या पुणेकरांना आश्चर्य वाटेल… परवा मी, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे आमच्यामध्ये बैठक होती. भूसंपादनाचे दर बदलायचे होते. यात काही उदाहरणं आमच्यापुढे अशी आली की 1 एकराला 18 कोटी रुपये आम्हाला द्यावे लागले. आता जर एक एकराला 18-18 कोटी रुपये द्यावे लागले तर ते व्यवहार्य नाहीये.’

‘एक काळ असा होता की त्यावेळी पैसं देणं इतकं कमी होतं, लोकं वैतागायचे, आता त्याच्या रकमा इतक्या वाढल्या, लोकं आता भेटून सांगतात, आणि सांगतात अमुक तमुक रस्ता चाललाय ना, तो आमच्या शेतातून जायची व्यवस्था करा कि… इतका विरोधाभास झालेला आहे. ही फॅक्ट आहे,’ असं अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!