Share

‘नाशिकमधील जलसंपदा कार्यालय औरंगाबादला हलवण्याची गरज काय?’, कराडांच्या भूमिकेनंतर भुजबळांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : नाशिक येथील जलसंपदा कार्यालये औरंगाबाद व वैजापूर येथे हलविण्याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड केले आहे. वरच्या बाजूच्या भाम, भावली, वाकी व मुकणे या मराठवाड्यासाठी असलेल्या धरणांतील पाणी पिण्याच्या नावाखाली तिकडे शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे या धरणांच्या पाण्याचे नियंत्रण मराठवाड्यातील वैजापूर पाटबंधारे कार्यालयाकडे देण्यात यावे, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी भूमिका मंत्री कराड यांनी मांडली.

नांदूर मधमेश्वर प्रकल्पांतर्गत वरच्या भागात असलेली भाम, भावली, वाकी आणि मुकणे या चार धरणांचे दोन उपविभाग नाशिकला आहेत. मराठवाड्याला जर पिण्यासाठी पाणी सोडण्याची वेळ आली तर नाशिक येथील या उपविभागीय कार्यालयांना विनंती करावी लागते. वास्तविक पाहता ही चार धरणे नांदूर मधमेश्वर प्रकल्पांतर्गत असून, हा प्रकल्प वैजापूर विभागात आहे. यासाठी नाशिकमधील या उपविभागांकडे असलेले या धरणांचे नियंत्रण वैजापूर मुख्यालयाला देण्यात यावे अशी भूमिका कराडांनी मांडली होती.

यावर बोलताना नदीजोड प्रकल्पासह मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणारे नाशिकमधील कार्यालय औरंगाबादला हलवण्याची गरज काय? असा सवाल नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

‘महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार समन्यायी तत्त्वाने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे त्यात कार्यालयाचा मुद्दा गौण ठरतो. उगाच याविषयात राजकारणाची गरज नसल्याचे परखड मत भुजबळ यांनी व्यक्त केले. पाण्यावर नाशिक व मराठवाडा या दोघांचाही हक्क आहे. जेव्हा मराठवाड्याला पाण्याची गरज असेल तेव्हा ते नक्कीच दिले जाईल. कार्यालये कोठेही जाणार नाही. यावर राजकारण करायचे नाही’ असे भुजबळ यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!