Share

ड्रग्ज प्रकरणावर मुख्यमंत्री बोलत का नाही?, राऊतांनी केला खुलासा; म्हणाले…

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून ड्रग्जसंदर्भातील आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. परंतु असे असतांनाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्व प्रकरणावर शांत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे या प्रकरणावर बोलणार की नाही?, याचा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान केला आहे.

एका मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री ड्रग्ज आरोप प्रत्यारोप प्रकरणावर का बोलत नाहीत? असे विचारण्यात आले असता राऊत म्हणाले की,’योग्य वेळी ते बोलतील. सध्या आम्ही पुरेसे आहोत. या विषयावर बोलणं हे मुख्यमंत्र्यांच कामच नाहीय. राज्य संभाळणं त्याचं काम आहे’, असे ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे अंडरवर्ल्डशीसंबंध नाही. मी भाजपामधले १० पदाधिकारी देऊ शकतो. जे तुरुंगांमधून शिक्षा भोगून बाहेर आहेत आणि आज पक्षाचे पदाधिकारी आहेत. कोल्हापूरातून कोणं आलं आहे, चेंबूरमधून कोण आलंय. तसेच कोण कोणत्या गँग चालवत होते हे मी द्यायचं ठरवलं तर माझ्यासारखा तज्ज्ञ माणूस नाही’, असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!